Pune : शहरात अवकाळी पावसामुळे ‘ड्रेनेज लाईन’ होत आहेत ‘चोकअप’

एमपीसी न्यूज – पुणे शहरात रोज होत असलेल्या अवकाळी पावसामुळे ‘ड्रेनेज लाईन चोकअप’ होत आहेत. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी त्या संदर्भातील प्रश्न उपस्थित केले. जेटिंग, स्पायडर मशिनच्या साहाय्याने या ड्रेनेज लाईनची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश अध्यक्ष सुनील कांबळे यांनी आज महापालिका प्रशासनाला दिले.

ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत असल्याने घाण वास येतो. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीत वाढ होते. या रस्त्यांवर अपघात होण्याचीही भीती असते. सध्या रोज पाऊस होत आहे. महापालिका प्रशासन आणि ओढ्यांच्या कडेने राहणाऱ्या झोपडपट्टी वासीयांनी पावसाचा धसका घेतला आहे. रस्त्यांवर ठीकठिकाणी खड्डेही पडले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.