Pimpri: पाणी प्रश्न, स्मार्ट सिटीची कामे, बैलगाडा शर्यतीचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य – महापौर जाधव

मुजोर अधिका-यांना सरळ  करु; विरोधकांना सोबत घेऊन कामकाज करणार 

एमपीसी न्यूज – शहराची लोकसंख्या दिवसें-दिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. बाधित नागरिकांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही. आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचे काम देखील हाती घेण्यात येणार आहे. पिंपळेसौदागर भागाचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला असून या भागाचा प्रायोगिक तत्वार विकास केला जाणार आहे. हे काम पुर्ण करण्यासाठी आणि शेतक-यांच्या जिव्हाळ्याची बैलगाडा शर्यतीचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देणार असल्याचे, नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.

महापौर राहुल जाधव आज (मंगळवारी) ‘एमपीसी न्यूज’ कट्यावर आले होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना मनमोकळ्या पणाने उत्तरे दिली.

अधिकारी पगार घेतात. त्यामुळे त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. आम्ही कामे केल्यामुळे शहरातील जनतेने आम्हाला सत्ता दिली आहे. अधिका-यांकडून काम करुन घेण्याची जबाबदारी शहरवासियांनी आमच्यावर दिली आहे. ती पार पाडली जाईल. अधिका-यांनी कामात कुचराई न करता इमानदारीने काम करावे. कामात दिरंगाई करणा-यांना धडा शिकविला जाईल. मुजोर अधिका-यांना सरळ केले जाईल. आगामी आठ दिवसात त्याचे परिणाम दिसतील असे सांगत महापौर जाधव म्हणाले सत्ता गेल्यामुळे पाण्यातून बाहेर आलेल्या माशाप्रमाणे विरोधकांची अवस्था झाली आहे. 15 वर्ष ते सत्तेत होते. त्यामुळे त्यांना वाईट वाटत आहे. त्यांना सोबत घेऊन कामकाज करणार आहे. भविष्यात सभागृहात ताण-तणाव निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.

महापौर जाधव म्हणाले, शहराचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. शहर सुजलम, सुफलम करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. शहराला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात येईल. शहराचा विकास होत आहे. पुण्याच्या तुलनेत काही गोष्टींमुळे घसरण होत असेल तर ते सुधारण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल.  ग्रामीण भागाचा विकास सुनियोजितपणे करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील एका प्रभागात खेळाचे मैदान आणि एक उद्यान विकसित केले जाणार आहे. तसेच डीपी रस्ते, 24 तास पाणीपुरवठा योजना सुरु करणार आहे.  आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही केलेली कामे जनतेसमोर मांडणार आहोत. या कामाच्या जोरावर आगामी निवडणुकीत भाजपचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बैलगाडा शर्यतीला राजकीय स्वरुप आल्यानेच शर्यती बंद झाल्या आहेत. ज्याला राजकारणत यशस्वी व्हायचे तो शर्यती घ्यायचा, त्यामुळे शर्यती डोळ्यावर आल्या आणि त्यावर बंदी आली. राजकारणामुळे आमच्या आनंदावर विरजण आल्याची खंत व्यक्त करत महापौर जाधव म्हणाले, शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आमदार महेश लांडगे त्याबाबत वारंवार पाठपुरावा करत आहेत. सरकार देखील सकारात्मक आहे. न्यायालयात बैलगाडा मालकांची बाजू मांडण्यासाठी सरकारने स्वखर्चाने वकील दिला आहे.

औद्योगिकनगरी म्हणून शहराची ओळख आहे. त्यामुळे कष्टक-यांना ज्यावेळी मदत लागले त्यावेळी त्यांना मदत करणार आहे. विजय हा सत्याचा असतो. कर्म चांगले ठेवा फळ मिळतेच. संघर्षातून जो आनंद मिळतो. तो सर्वात मोठा असतो, असेही ते म्हणाले.

Pimpri: पाणी प्रश्न, स्मार्ट सिटीची कामे, बैलगाडा शर्यतीचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य – महापौर जाधव

मुजोर अधिका-यांना सरळ  करु; विरोधकांना सोबत घेऊन कामकाज करणार

एमपीसी न्यूज – शहराची लोकसंख्या दिवसें-दिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. बाधित नागरिकांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही.आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचे काम देखील हाती घेण्यात येणार आहे. पिंपळेसौदागर भागाचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला असून या भागाचा प्रायोगिक तत्वार विकास केला जाणार आहे. हे काम पुर्ण करण्यासाठी आणि शेतक-यांच्या जिव्हाळ्याची बैलगाडा शर्यतीचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देणार असल्याचे, नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.

महापौर राहुल जाधव आज (मंगळवारी) ‘एमपीसी न्यूज’ कट्यावर आले होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना मनमोकळ्या पणाने उत्तरे दिली.

अधिकारी पगार घेतात. त्यामुळे त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. आम्ही कामे केल्यामुळे शहरातील जनतेने आम्हाला सत्ता दिली आहे. अधिका-यांकडून काम करुन घेण्याची जबाबदारी शहरवासियांनी आमच्यावर दिली आहे. ती पार पाडली जाईल. अधिका-यांनी कामात कुचराई न करता इमानदारीने काम करावे. कामात दिरंगाई करणा-यांना धडा शिकविला जाईल. मुजोर अधिका-यांना सरळ केले जाईल. आगामी आठ दिवसात त्याचे परिणाम दिसतील असे सांगत महापौर जाधव म्हणाले सत्ता गेल्यामुळे पाण्यातून बाहेर आलेल्या माशाप्रमाणे विरोधकांची अवस्था झाली आहे. 15 वर्ष ते सत्तेत होते. त्यामुळे त्यांना वाईट वाटत आहे. त्यांना सोबत घेऊन कामकाज करणार आहे. भविष्यात सभागृहात ताण-तणाव निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.

महापौर जाधव म्हणाले, शहराचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. शहर सुजलम, सुफलम करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. शहराला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात येईल. शहराचा विकास होत आहे. पुण्याच्या तुलनेत काही गोष्टींमुळे घसरण होत असेल तर ते सुधारण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल.  ग्रामीण भागाचा विकास सुनियोजितपणे करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील एका प्रभागात खेळाचे मैदान आणि एक उद्यान विकसित केले जाणार आहे. तसेच डीपी रस्ते, 24 तास पाणीपुरवठा योजना सुरु करणार आहे.  आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही केलेली कामे जनतेसमोर मांडणार आहोत. या कामाच्या जोरावर आगामी निवडणुकीत भाजपचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बैलगाडा शर्यतीला राजकीय स्वरुप आल्यानेच शर्यती बंद झाल्या आहेत. ज्याला राजकारणत यशस्वी व्हायचे तो शर्यती घ्यायचा, त्यामुळे शर्यती डोळ्यावर आल्या आणि त्यावर बंदी आली. राजकारणामुळे आमच्या आनंदावर विरजण आल्याची खंत व्यक्त करत महापौर जाधव म्हणाले, शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आमदार महेश लांडगे त्याबाबत वारंवार पाठपुरावा करत आहेत. सरकार देखील सकारात्मक आहे. न्यायालयात बैलगाडा मालकांची बाजू मांडण्यासाठी सरकारने स्वखर्चाने वकील दिला आहे.

औद्योगिकनगरी म्हणून शहराची ओळख आहे. त्यामुळे कष्टक-यांना ज्यावेळी मदत लागले त्यावेळी त्यांना मदत करणार आहे. विजय हा सत्याचा असतो. कर्म चांगले ठेवा फळ मिळतेच. संघर्षातून जो आनंद मिळतो. तो सर्वात मोठा असतो, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.