Ram Mandir: राम मंदिर भूमीपूजनाचा उत्साह शिगेला; विद्युत रोषणाई, रंगरंगोटीने सजली अयोथ्या नगरी

preparation of ram temple bhumi pujan in ayodhya भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी सव्वालाख लाडूंचा नैवेद्य दाखवला जाणार आहे त्याचीही तयारी जोरदार सुरू असल्याचे दिसत आहे.

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी भव्य राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर भूमीपूजनाचा अयोध्या नगर मध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे. अयोध्याच्या रस्त्यावर रंगरंगोटी केली असून रामायणातील विविध पात्रं साकारली आहेत.

अयोध्याच्या भिंतींवर रामायणातील रामायणातील कथा आणि विविध पात्रं यांच्या चित्रातून रामायण साकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे चित्र साकारणारे सर्व मुस्लिम असल्याचे सांगितले जात आहे. भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी सव्वालाख लाडूंचा नैवेद्य दाखवला जाणार आहे त्याचीही तयारी जोरदार सुरू असल्याचे दिसत आहे.

अयोध्येतील ऐतिहासिक शरयू घाटावर साफसफाईचे काम सुरू आहे. याच ठिकाणी दिपप्रज्वलन केले जाणार आहे.

छायाचित्र- प्रशांत कदम यांच्या टि्वटर हँडलवरुन
छायाचित्र- प्रशांत कदम यांच्या टि्वटर हँडलवरुन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.