Pimpri : लोकसभेची तयारी; रावसाहेब दानवे उद्या घेणार संघटनात्मक आढावा

एमपीसी न्यूज –  आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार संघटनात्मक आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उद्या (शुक्रवारी) आढावा घेणार आहेत. 

चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनमध्ये शुक्रवारी (दि. 26) सकाळी दहा वाजता आढावा बैठकीला सुरुवात होणार आहे.

मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. मावळ आणि शिरुर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे 12 मतदारसंघ आहेत. या 12 मतदारसंघांतील पक्षाचा संघटनात्मक आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष दानवे या मतदारसंघांतील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.