BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : विधानसभेवर पुन्हा भगवा फडकाविण्यासाठी तयारीला लागा – रावसाहेब दानवे 

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीत राज्यातील 228 विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीला मताधिक्य आहे. त्यामुळे हा उत्साह विधानसभा निवडणुकीत देखील कायम ठेवा. आता विधानसभा जिंकण्याचे डोळ्यासमोर ठेवा. विधानसभेवर भगवा फडकाविणे हे प्रथम कर्तव्य आहे. विधानसभेवर पुन्हा भगवा फडकाविण्यासाठी उत्साहाने तयारीला लागा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. तसेच विधानसभेला शिवसेना-भाजपची युती नक्की राहणार असून जागांचा ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्मुला ठरला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पिंपरी, संत तुकारामनगर येथील  आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या आज (सोमवारी)झालेल्या कार्यक्रमात बोलताना दानवे पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला राज्यात घवघवीत यश मिळाले. दोन्ही पक्षांनी 42 जागा जिंकल्या आहेत.  शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केले. त्यामुळेच हे यश मिळविणे शक्य झाले आहे. त्यामुळे हा उत्साह कायम ठेवा. राज्यातील 228 विधानसभा मतदारसंघात युतीला मताधिक्य आहे. त्यामुळे विरोधकांच्या वाट्याला पाच-पाच जागा येतील. मी म्हणणारे लोकसभा निवडणुकीत गायब झाले आहेत. याचा जोषाने आता आपल्याला विधानसभा  निवडणुकीला सामोरे जायचे आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती कायम राहणार आहे. दोन्ही पक्षांना लढवायच्या जागांचा फॉर्मुला ठरला आहे. भाजप-शिवसेना निम्या- निम्या जागा लढविणार आहे. जागा वाटपासंदर्भात शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होईल. त्यामध्ये जागा वाटपा संदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही दानवे यांनी सांगितले.

.