Pimpari News : पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरमध्ये “पिच फेअर 2021” चे सादरीकरण  

एमपीसी न्यूज :  पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर (PCSIC) आणि डीवाय पाटील टेक्निकल इन्स्टिट्यूट (DIT) यांच्यावतीने शुक्रवारी “पिच फेअर 2021” चे आयोजन करण्यात आले होते. ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे झालेल्या या उपक्रमात पीसीएसआयसीच्या वतीने एकूण 25 स्टार्टअपने सादरीकरण केले. तसेच, मुंबई व पुणे येथील गुंतवणुकदारांनी प्रत्यक्ष स्टार्टअपची पाहणी करून त्यातील विशेष माहिती जाणून घेतली.

यावेळी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, ऑटो क्लस्टरचे एमडी किरण वैद्य, डीआयटीचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, पीसीएसआयसी व्यवस्थापक उदय देव, ईडीएसआय अधिष्ठाता भावना अंबुडकर, डॉ. महुवा भौमिक, आदित्य मासरे आदी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या सुचनांनुसार पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटी लिमिटेड च्या वतीने शहरात १ ते ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आझादी का अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शहरातील नव स्टार्टअपला चालना देणे व त्यांना गुंतवणुकदार उपलब्ध होणेकरीता पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरमध्ये “पिच फेअर 2021” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बँक ऑफ बडोदा सह इतर दोन गुंतवणुकदारांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून स्टार्टअप्सचे विशेष जाणून घेतले. यामध्ये, चकोर गांधी, भावेश कोठारी, पंकज मित्तल या गुंतवणुकदारांनी पिच फेअरमध्ये सहभाग घेतला. प्रसंगी, डीवाय पाटील कॉलेजच्या संघांने त्यांच्या व्यवसाय कल्पना देखील सादर केल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उदय देव तर डॉ. भौमिक यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.