Pune : Pimpri-Chinchwad : शहरात मान्सून पूर्व पावसाच्या सरी; उकाड्यातून सुटका; वातावरणात गारवा

विजांचा कडकडाट सुरू; शहरातील काही भागात बत्ती गुल

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात आज सायंकाळी मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसल्या.  उन्हाळा लांबल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरवासियांना या पावसाने दिलासा दिला.  मोठ्या प्रतीक्षेनंतर उकाड्यातून सुटका होऊन वातावरणात गारवा पसरल्याने नागरिक याचा आनंद लुटत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत उकाडा जाणवत होता. त्यानंतर वातावरण हळूहळू बदलत गेले. सायंकाळी सहाच्या सुमारास वारा सुटला. ढगाळ वातावरण निर्माण झाले. सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून विजांचा कडकडाट सुरू झाला. तसेच शहरात ठिकठिकाणी धुळीचे लोट निर्माण झाले. सायंकाळी सातनंतर पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. पुण्यातही सायंकाळनंतर वातावरण बदलले. ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड, आकुर्डी, निगडी, कासारवाडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, रावेत, देहूरोड या परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. जवळपास एक तासभर पाऊस पडला. अजूनही काही भागात तुरळक पाऊस सुरू आहे. तर पुण्यातही हडपसर भागात पावसाच्या सरी कोसळल्या. तर रात्री आठनंतर सदाशिव पेठ, डेक्कन आदी भागात पाऊस पडला.  पाऊस पडल्याने वातावरणातील उकाडा नाहीसा होऊन गारवा निर्माण झाला. तर शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला.

पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी आज तामपानात पुन्हा वाढ झाली आहे. पुण्याचे तापमान 37.6 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले तर लोहगावचे तापमान 38.1 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.