PM Modi Dehu Visit : पंतप्रधान मोदी यांचे उद्या देहूत आगमन, राज्यभर हाय अलर्ट जारी

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Dehu Visit) यांचे उद्या (दि. 1४ जून) श्री क्षेत्र देहू येथे आगमन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या कारणास्तव केंद्रिय यंत्रणांच्या सूचनांनंतर पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईमध्ये सुद्धा हा अलर्ट जारी करण्यात आला असून ठिकठिकाणी नाकेबंदी, मुंबईत दाखल होणारी वाहने, संशयित वाहने यांच्यावर पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. 

संत तुकाराम महाराजांचे शिळा मंदिर आणि मुर्तीचे १४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Dehu Visit) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान देहू येथे येणार असल्याची माहिती देहू संस्थानने दिली आहे. ज्या शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान देहूमध्ये येणार त्या मंदिराची पायाभरणी प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती असताना केली होती. दगडावर कोरीव काम करून संपूर्ण मंदिर बांधले गेले आहे, त्यामुळे संपुर्ण देहूवासी, देहू संस्थान, वारकरी संप्रदायाचे मंदिराच्या लोकार्पणाकडे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray : “मला वाढदिवसाच्या दिवशी कोणालाच भेटता येणार नाही” – राज ठाकरे

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या देहू भेटीवेळी घातपात घडू नये राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिस यंत्रणा सुद्धा शहरात जाणाऱ्या – येणाऱ्या सगळ्यांचीच कसून चौकशी करत आहे. संपूर्ण दोन दिवस हा अलर्ट जारी करण्यात आला असून रात्री ठिकठिकाणी पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.