BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांना माझे नाव घेतल्याशिवाय झोपच लागत नाही – शरद पवार

शरद पवार यांचे आगमन होताच, कोण आला रे कोण आला, मोदी - शहा यांचा बाप आला, कार्यकर्त्यांची अशी जोरदार घोषणाबाजी

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्र्रात आल्यावर माझे नाव घेतल्याशिवाय शांत झोपच लागत नाही. मोदी यांचे ठीक आहे, पण शहा यांचे काय? असा चिमटाही त्यांनी काढला. लोक तुमच्या बरोबर आहेत तर, मोदी यांना 8 ते 9 सभा, शहा यांना 20 सभा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा का घ्यावा लागत आहे, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. आपले राजकारण चालणार नाही. निवडणुकीत यश मिळण्याची खात्री नाही. त्यामुळेच या सभा होत असल्याचा हल्लाबोल पवारांनी केला. 

हडपसर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी जाहीर सभा आयोजित केली होती. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार कमल ढोले पाटील, माजी महापौर प्रशांत जगताप, राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर उपस्थित होत्या.
शरद पवार म्हणाले, मोदी आणि शहा मला 370 वर का बोलत नाही म्हणून सवाल उपस्थित करीत आहेत. पण, राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्यात, औद्योगिक धंदे बंद पडताहेत, बेरोजगारी वाढतेय, महिलांवर अत्याचार वाढतायेत, या सर्वांवर उत्तर केवळ 370 दिले जात आहे.
नाबार्ड सरकारी बँका, कारखाने, आजारी बँकांना मदत करते. या संचालकांशी माझे संबंध असल्याचे नाबार्डने म्हटले. या संचालकांशी माझे चांगले संबंध राहणारच असा विश्वास पवार यांनी आज व्यक्त केला. सत्तेचा वापर चांगल्या कामासाठी करायचा असतो. ईडी, सीबीआय या संस्थेने पानसरे, कुलबुर्गी प्रकरणाचा तपास करावा. मात्र, सत्ताधारी त्याचा वापर विरोधकांवर कारवाई करण्यासाठी करीत आहेत.
बाळासाहेब शिवरकर म्हणाले, महाराष्ट्राला शरद पवार यांची गरज आहे. 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पवार मुख्यमंत्री असताना शेतकरी सुखात होता. माझं राहिलेलं आयुष्य पवारांना मिळावं. भाजपकडे 3 मोदी असून, 2 मोदी परदेशात राहतात. आपले पंतप्रधान कधी विदेशात निघून जातील, याचा भरवसा नाही. आघाडीच्या सरकारची गरज आहे. 10 वर्षे झाले आघाडीचा आमदार नाही. वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. पाण्याची सोय व्हावी, तसेच हडपसर भागातील इंडस्ट्री बंद पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
चेतन तुपे म्हणाले, अतिशय भ्रष्ट्राचारी आमदार असून, त्याने बिल्डरकडून मर्सिडीज घेतली. पुणे शहराचा संपूर्ण कचरा हडपसरमध्ये टाकला जातो. त्यात भागीदारी आमदारांच्या ‘पीए’ ची आहे. ही निवडणूक वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. हडपसरची निवडणूक जनतेने, कार्यकर्यांनी हाती घेतली आहे.
HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like