PM Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर, वाचा सविस्तर कार्यक्रम…

एमपीसी न्यूज – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi in Mumbai) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. मुंबईतील राजभवन येथील ‘क्रांतिकारी गॅलरी’चे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi in Mumbai) यांचा आज महाराष्ट्र दौरा आहे. आपल्या पहिल्या कार्यक्रमात ते पुण्यातील देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची या मंदिरात लोकार्पण करणार आहेत. हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर नरेंद्र मोदी मुंबईसाठी रवाना होतील. राज्यपाल सी विद्यासागर राव असताना मुंबईतील राजभवन येथे एक भुयार सापडलं होतं. या गोळ्यामध्ये गॅलरी स्थापन करण्यात आली आहे. या गॅलरीत चाफेकर बंधू आणि सावरकर बंधू यांची चित्रे आणि प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Ashadhi Wari 2022 : आषाढी वारीसाठी एसटीची जोरदार तयारी, पुणे विभागातून पंढरपूरसाठी 530 बस

दरम्यान राजभवन येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार की नाही याबाबत चर्चा होत्या. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं सांगण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे या कार्यक्रमात एकत्र येणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.