COVID-19 : पीएम मोदींनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस, पण सीरमची का भारत बायोटेकची खाली वाचा

एमपीसी न्यूज : कोरोनावर मात करण्यासाठी भारतात लस देण्याची मोहिम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घ्यावी अशी आग्रहाची मागणी विरोधकांकडून होत होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली आहे.

कोरोनाची लसीकरणाच्या मोहिमेचा तिसऱ्या टप्पा आजपासून सुरू होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन लस टोचून घेतली आहे. पंतप्रधानांनी भारत बायोटेकची  COVAXIN लस घेतली आहे. एम्स हॉस्पिटलमधील काम करणाऱ्या आणि पुद्देचरी येथील राहणाऱ्या परिचारिका पी निवेदा यांनी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाची लस दिली आहे.

देशात लसीकरणाच्या (corona vaccination) तिसऱ्या टप्प्याल सुरुवात होणार आहे. या टप्प्यात 60 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. सोबतच 45 वर्षांवरील पण गंभीर आजार असणाऱ्या लोकांचंही या टप्प्यात लसीकरण दिलं जाणार आहे. आता सरकारी रुग्णालयांसोबतच काही खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ज्या रुग्णालयांमध्ये जन आरोग्य योजना तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजना राबवल्या जातात तिथे हे लसीकरण देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.