Corona Vaccine : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

एमपीसी न्यूज : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवारी) सकाळी कोरोना लसीचा दुसरा डोस दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन घेतला आहे. कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पंतप्रधान मोदींनी १ मार्च २०२१ रोजी एम्स रुग्णालयात घेतला होता.

_MPC_DIR_MPU_II

पंतप्रधान मोदींनी कोरोना लस घेतल्याचे ट्विट करत सांगितले आहे. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्याकडे लस हाच पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही जर लस घेण्यास पात्र असाल तर आपल्या लसीचा डोल लवकरात लवकर घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारत बायोटेक या स्वदेशी कंपनीच्या बनवेल्या कोव्हॅक्सिन लसीचा डोस देण्यात आला आहे. मोदींनी पहिला डोस याच कंपनीचा घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.