Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अर्थमंत्र्यांचा अवमान – पृथ्वीराज चव्हाण

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा अवमान होत आहे. अर्थसंकल्पात मोदी यांचा हस्तक्षेप वाढला आहे. मोदी, गृहमंत्री अमित शहा स्वतःच उद्योगपतींना भेटत आहे. त्यावेळी निर्मला सितारामन उपस्थित नव्हत्या. त्यांच्या जागी कोणाला आणायचे असेल तर आणा, मात्र त्यांचा मान राखा, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

काँग्रेस भवन येथे बुधवारी दुपारी पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रवक्ते गोपाळ तिवारी, ऍड. अभय छाजेड उपस्थित होते.

दि. 1 फेब्रुवारी अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थव्यवस्था अत्यंत मंदीच्या वातावरणात आहे. स्वतंत्र भारतात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजेटची सूत्रे हाती घेतली आहेत. अर्थमंत्री याचे भाषण नसून पंतप्रधानांचे असेल, असेही चव्हाण म्हणाले. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची मोदी यांनी घोषणा केली आहे. आपले दर डोई उत्पन्न अमेरिका, सिंगापूरपेक्षा कमी आहे. तर, आपले 2 हजार तर चीनचे 10 हजार डॉलर म्हणजेच पाचपट दरडोई उत्पन्न आहे.

आपल्याला दुप्पट दरडोई उत्पन्न करण्यासाठी किती वेगाने काम करावे लागेल, याची आठवणही त्यांनी करून दिली. आपला विकास दर साडेचार टक्के अत्यल्प आहे. हे मोदी सरकारचे अपयश आहे. 5 ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट यामध्ये कसे पूर्ण होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यासाठी 10 ते 12 टक्के विकास दर हवा आहे. या सरकारच्या काळात रोजगार निर्मिती, गुंतवणूक होत नाही. कारखाने बंद पडत आहेत.

भारताच्या अर्थव्यवस्थेतील विकासदर हा खरा नसल्याचे काही अर्थ तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अडीच टक्क्यांनी विकासदर फुगविण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुढील पिढ्या माफ करणार नाही. असाच विकासदर राहिला तर दुप्पट उत्पन्न व्हायला 36 वर्षे लागणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नोटबंदी, विविध टॅक्स वाढविले. परदेशातील काळा पैसा आणणार असल्याचे मोदी म्हणाले होते. त्यासंबंधीची यादीही मोदी यांना देण्यात आली आहे. पण, त्यांच्या जवळचे मित्र, आश्रयदाते यांची नावे असल्याने मोदी सरकार कारवाई करीत नाही, असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

HB_POST_END_FTR-A2
You might also like