Pimpri : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचे एलईडी स्क्रिनद्वारे प्रक्षेपण 

एमपीसी न्यूज – भारताचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचे थेट प्रक्षेपण पिंपरीतील संत तुकारामनगर येथील महेश नगर चौकात एलईडी स्क्रीनद्वारे नागरिकांना दाखविण्यात आले.  यावेळी भाजपचे  कार्यकर्ते उपस्थित होते.  

आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होत आहे. नरेंद्र मोदी यांनी सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवन येथे पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नगरसेवक ,कार्यकर्ते यांना दिल्लीतील थेट पंतप्रधान शपथ विधी सोहळा पाहता यावा म्हणून पिंपरीतील संततुकारामनगर येथील महेशनगर चौकात करण्यात आले होते. यावेळी “मोदी, मोदी” अशा घोषणा देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.