BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारपासून पंधरा मिनिटांचे पाच ब्लाॅक

खंडाळा घाटातील दरड काढणार

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगदा भागातील सैल झालेल्या दरडीचे दगड काढण्यासाठी मंगळवार (दि.12) ते बुधवार (दि.20) दरम्यान पंधरा मिनिटांचे पाच ब्लाॅक घेण्यात येणार आहेत.

या ब्लाॅक दरम्यान मुंबई आणि पुणे या दोन्ही मार्गीकांवरील वाहतुक थांबविण्यात येणार असल्याची माहिती पुणे महामार्गचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

  • या ब्लाॅक दरम्यान येणार्‍या शनिवार आणि रविवारी वाहतुक सुरु राहणार आहे. सोमवार ते शुक्रवारी सकाळी (10 ते 10.15), (11 ते 11.15), (12 ते 12.15), दुपारी (2 ते 2.15) आणि (3 ते 3.15) या वेळेत वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

.