Prince Philip Passes Away : ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं निधन

एमपीसी न्यूज – ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या 99 व्या वर्षी निधन झालं आहे. बकिंगहम पॅलेसकडून यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. राणी एलिझाबेथ यांच्यासोबत प्रिन्स फिलीप यांचा 1947 साली विवाह झाला होता. ब्रिटिश राजघराण्याच्या इतिहासातील हे सर्वाधिक काळ सोबत व्यतीत केलेले पती-पत्नी होते.

ह्रदयाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर आठवड्यापूर्वी प्रिन्स फिलीप रुग्णालयातून पॅलेसमध्ये परतले होते. महिनाभर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

‘अतिशय दु:खाने राणी एलिझाबेथ हे जाहीर करते की त्यांचे पती प्रिन्स फिलीप, द ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांचं आज सकाळी विंडसर कॅसलमध्ये निधन झालं’, असं बकिंगहम पॅलेसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

प्रिन्स फिलीप आणि राणी एलिझाबेथ यांना चार मुलं, आठ नातू आणि 10 पणतू आहेत. प्रिन्स फिलीप यांचा जन्म ग्रीकमधल्या कोर्फू या बेटावर 10 जून 1921 रोजी झाला. राणी एलिझाबेथ ब्रिटनच्या राणी व्हायच्या 5 वर्ष आधी त्यांचा विवाह झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.