Pune : दारु अड्ड्यावर छापा; 62 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोहम्मद वाडी संतोष नगर येथे कंजारभाट वस्तीमध्ये प्रोहिबिशन संदर्भात गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी छापा घातला. या कारवाईत 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दोन पुरुष व चार महिला आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या कारवाईत 54 हजार रुपये किमतीची 1050 लिटर दारू तसेच आठ हजार रुपये किमतीची 1600 लिटर गुळ मिश्रित रसायन तर 600 रुपये किमतीचे 40 मोकळे कॅन असा एकूण 62 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेचे 5 अधिकारी व 25 कर्मचा-यांनी ही कारवाई केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.