Pune : अवैध दारु विक्रीवर छापा; 155 लिटर ताडी जप्त

एमपीसी  न्यूज – गुलटेकडी येथे छापा टाकून अवैध दारु विक्री करणा-या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 155 लिटर ताडी जत्प करण्यात आली आहे.

गुन्हेशाखा युनिट दोनचे अधिकारी व कर्मचारी हे स्वारगेट व सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोल्डन बेकरी समोर, गुलटेकडी येथे दोन जण अवैध ताडी विक्री करीत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा दोनच्या अधिका-यांनी तातडीने छापा मारून दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेली 155 लिटर ताडी व रोख दोन हजार 420, असा सर्व मिळून चार हजार 845 रु माल त्यांच्याकडून जत्प करण्यात आला. तसेच स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.