Pimpri : भाटनगर मधील दारू अड्ड्यावर छापा

एमपीसी न्यूज – पिंपरी मधील भाटनगर येथे पोलिसांनी दारूसाठ्यावर छापा मारला. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी आज (मंगळवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास केली. यामध्ये पोलिसांनी मोठा दारुसाठा जप्त केला.

भाटनगर येथील दहा लोकांवर या छाप्यामध्ये कारवाई करण्यात आली. 47 लिटर दारू, 1 हजार 500 लिटर दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने असा एकूण 23 हजार 910 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील भाटनगर येथे काही घरांमध्ये दारू भट्ट्या लावण्यात येत असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार भाटनगर येथील एका वसाहतीमध्ये छापा मारला. त्यावेळी प्लास्टिकच्या बॅलरमध्ये दारू भरून ठेवल्याचे आढळून आले. तसेच लहान पिंपांमध्ये भट्टी लावल्याचेही आढळले. त्यावरून आढळून आलेल्या संपूर्ण दारूची विल्हेवाट लावून संबंधितांवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
ही कारवाई पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास मुंढे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख आणि पिंपरी पोलीस ठाण्यातील 25 पोलीस कर्मचा-यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.