Yerwada : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तुरुंग अधिका-याला कैद्यांकडून मारहाण

एमपीसी न्यूज – येरवडा तुरुंगातील कैद्यांची भांडणे सोडविण्यासाठी गेलेले तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे (वय 33) व शिपाई समीर सय्यद यांना 14 कैद्यांनी मिळून मारहाण केली. याप्रकरणी सर्व कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा तुरुंगात काल (दि.2) सकाळी सात वाजता बंदी शाहरुख असलम खान व त्याच्या तीन साथीदारांनी शौचाला गेलेल्या तुषार हंबीर याला दगड व लोखंडी खिळ्याच्या सहाय्याने डोक्यावर गळ्यावर मारहाण केली. यामध्ये हंबीर गंभीर जखमी झाला. याचा बदला घेण्यासाठी तरुंगातील 14 ते 15 कैद्यांनी आज सकाळी शाहरुखला विटांनी मारहाण केली.

ही भांडणे सोडविण्यासाठी गेलेले तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे व शिपाई समीर सय्यद यांनांही कैद्यांनी विटेने मारहाण केली. यामध्ये एकशिंगे यांच्या नाकाला मुक्कामार लागला. तर सय्यद यांच्या डाव्या हाताला मार लागला. या प्रकरणी 14 कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.