Mumbai News : खासगी बसला 100 टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी

एमपीसी न्यूज – राज्य परिवहन महामंडळानंतर आता दिवाळीच्या गर्दीचा हंगाम लक्षात घेता खासगी बस वाहतूकदारांना सुद्धा 100 टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी खासगी बस वाहतुकदारांना केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाच्या नियमांचे पालन करने बंधनकारक राहणार आहे.  

महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम 1989 च्या नियम 20 (1) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनांच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलतांना तसेच प्रवाशांच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक फेरी अंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.
* या नियमांचे पालन बंधनकारक
– चालकाने प्रवासादरम्यान जेवण, अल्पोहार, प्रसाधनगृहासाच्या वापर याकरिता बस थांब्यावरील ठिकाणे स्वच्छ असल्याची खातरजमा करावी.
– बसमध्ये चढतांना, उतरताना तसेच प्रवासादरम्यान खानपानाकरिता व प्रसाधनगृहाच्या वापराकरीता बस थांबलेली असतांना प्रवाशांनी शारीरिक अंतर ठेवणे आवश्यक असेल.
– प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करणे तसेच त्याचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवाना धारकाची असेल.
– मास्क न घातलेल्या प्रवाशांना प्रवासासाठी परवानगी नाही. बसच्या प्रवेशव्दाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे तसेच बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत.
– तिकीट /चौकशी खिडकी स्वच्छ असावी.
– प्रवासाच्या आधी प्रवाशांच्या शरीराचे तापमान तपासावे. ताप, खोकला, सर्दी असल्यास प्रवासास परवानगी दिली जाणार नाही.
– प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देवू नये, कच-यासाठी कचराकुंडीचा वापर करण्याच्या व बसमध्ये स्वच्छता राखण्याच्या सूचना देण्यात याव्यात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.