Pune : ठराविक वेळेत लक्झरी बसेसना पुण्यात ‘नो एंट्री’

एमपीसी न्यूज- दिवाळी निमित्त पुणे शहरात विविध ठिकाणाहून लोक येत असतात. त्यामुळे मध्य पुणे शहरात वाहतूक कोंडी आणि अन्य अडचणींना बगल देण्यासाठी वाहतूक विभागाकडून सकाळी आठ ते दुपारी 12 आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत लक्झरी बसेसना शहरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याबाबतचे आदेश पुणे वाहतूक विभागाकडून काढण्यात आले आहेत. वाहतूक विभागाने लक्झरी बसेसना काही मार्ग ठरवून दिले आहेत. त्या मार्गावरूनच त्यांना प्रवास करावा लागणार आहे.

लक्झरी बसेससाठी ठरवून दिलेला मार्ग

  •  स्वारगेट, व्होल्गा चौक

साताऱ्याकडे : व्होल्गा चौक – मार्केटयार्ड चौक – सातारा रोड – कात्रज जंक्शन – नवले ब्रिज – वडगाव ब्रीज – चांदणी चौक हायवे

सोलापूरकडे : व्होल्गा चौक – सातारा रोड – मार्केटयार्ड – वखार महामंडळ चौक – गंगाधाम चौक – लुल्लानगर चौक – वानवडी पोलीस चौकी – भैरोबानाला – पेट्रोलपंप युटर्न – सोलापूर रोड

  • संगमवाडी पुणे

अहमदनगरकडे : संगमवाडी – शहादवलबाब – तारकेश्वर चौक – पर्णकुटी – शास्त्रीनगर चौक – नगर रोड

नाशिककडे : संगमवाडी – पाटील इस्टेट – खडकी रोड (ब्रिज खालून) – पोल्ट्री फार्म – चर्च चौक – नाशिक फाटा – नाशिक रोड

मुंबईकडे : संगमवाडी – संचेती चौक – स.गो. बर्वे चौक – सिमला ऑफिस चौक ब्रिजवरून गणेशखिंड रोड – ब्रेमन चौक – नदीपुलावरुन पिंपरी-चिंचवड

  • निगडी

सोलापूरकडे : बोपोडी चौक – पोल्ट्री फार्म – संगमवाडी – शहादवलबाबा – पर्णकुटी चौक – सर्किट हाऊस चौक – मोरओढा चौक – एम्प्रेस गार्डन चौक – भैरोबानाला – सोलापूर रोड

वरील मागावरील लक्झरी बसेससाठी थांबे देखील नियोजित करण्यात आले आहेत. या थांब्यांवर प्रत्येक बस केवळ दोन मिनिट थांबणार आहे.

लक्झरी बस थांबे

  • स्वारगेट ते सातारा रोड 

पद्मावती – आण्णाभाऊ साठे सभागृह या ठिकाणी जास्तीत जास्त चार बस एका वेळी थांबतील.

कात्रज सर्पोद्यान – या ठिकाणी जास्तीत जास्त 10 बस एका वेळी थांबतील.

  • पुणे-मुंबई रोड

पद्मावती – आण्णाभाऊ साठे सभागृह या ठिकाणी जास्तीत जास्त चार बस एका वेळी थांबतील.

कात्रज सर्पोद्यान – या ठिकाणी जास्तीत जास्त 10 बस एका वेळी थांबतील.

चांदणी चौकामध्ये बसेसना फक्त 1 मिनीट थांबण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  • पुणे सोलापूर रोड

लुल्लानगरजवळ जकातनाका (कॅंटोन्मेंट टोल नाका) व येताना नेताजी नगर जवळ एका वेळी जास्तीत जास्त दोन बसेस थांबतील.

  • पुणे – नगर रोड 

वाघोली (शहादावलदर्गा ते तेलाची मोरी पर्यंत कोठेही थांबण्यास परवानगी नाही)

  • पुणे – नाशिक रोड

दापोडी (बोपोडी ते पाटील इस्टेट या दरम्यान कोठेही थांबण्यास परवानगी नाही)

  • पुणे- मुंबई रोड

पीएमआरडी समोर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.