Pimpri News: शहरातील खासगी रूग्णालयांना राज्य सरकारच्या संकेतस्थळावरून परवाना घेता येणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयांना आता परवान्यासाठी महापालिकेडे हेलपाटे मारण्याची आवश्यकता भासणार नाही. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने राज्यातील सर्व खासगी रूग्णालयांना परवाना देण्यासाठी एकच सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या संकेतस्थळावरून महापालिका खासगी रूग्णालयांना परवाना देणार आहे.

रूग्ण सेवेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात 588 खासगी रूग्णालये उभारण्यात आली आहे. या रूग्णालयांना महापालिकेकडून अधिकृत परवाना घ्यावा लागतो. त्यांच्या प्रमाणपत्राचे दर तीन वर्षांनी नूतनीकरणही करण्यात येत असते. शहराची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने विविध आजारांच्या रूग्णांची संख्याही वाढत आहे. आत्तापर्यंत सुमारे 400 खासगी रूग्णालयांनी अधिकृत परवाना घेतला आहे. विविध कागदपत्रांच्या कमतरतेमुळे 27 जणांचे अर्ज प्रलंबित असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे. ज्या रूग्णालयांनी आत्तापर्यंत अधिकृत परवाना घेतला नाही, अशा रूग्णालयांनी 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व कागदपत्रांसह अर्ज करावेत, असे आवाहन वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे केले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात खासगी रूग्णालय सुरू करण्यासाठी महापालिका अधिकृत परवाना घ्यावी लागते. ती परवानगी महापालिका ऑफलाइन पध्दतीने देत होती. परवाना देण्यासाठी जास्त वेळ लागत होता. त्यामुळे पालिकेच्या वैद्यकीय विभागाने परवाना ऑनलाइन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, आता राज्य सरकारने संकेतस्थळ सुरु केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.