Vadgaon Maval : खाजगी शाळांनी अवाजवी फी कमी करून फक्त ट्युशन फी घ्यावी : तहसीलदार मधुसूदन बर्गे

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे शहरातील खाजगी शाळांनी सर्व अवाजवी फी कमी करून फक्त ट्युशन फी घ्यावी, असा निर्णय तहसीलदार मधुसूदन बर्गे व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी वडगाव मावळ येथे संस्थाचालकांच्या बैठकीत दिला असल्याची माहिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक अरूण माने यांनी दिली. 

_MPC_DIR_MPU_II

पालक संघर्ष समितीच्या वतीने सोमवार (दि 28) जिजामाता चौक तळेगाव दाभाडे येथे फि माफ करावी म्हणून नगरसेवक अरुण बबन माने यांचे नेतृत्वाखाली पालक संघर्ष समितीने  ” आंदोलन केले. यावेळी  जमीर नालबंद, आशिष खांडगे, अर्चना दाभाडे, तेजस्वी राठोड, किरण साळवेे, जयवंत कदम, बाप्पू कदम, अॅड.विनायक डूबल, योगेश जाधव, संदिप धामणकर, संदिप गोळे, अमित प्रभावळकर, सुनिल आंबेकर,अविनाश पिसाळ,आरिफ सय्यद, नंदू लहाने,सारिका कडूस्कर, अवंतिका चव्हाण, प्रीती शिंदे,रुपाली मेश्राम ” आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले होते अशा परिस्थितीत सर्व शैक्षणिक संस्था या बंद होत्या या बंद च्या कालावधीत विद्यार्थी शाळेत गेलेले नसताना सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळानी संपूर्ण वर्षभराची  फी वसुली करत असल्याच्या विरोधामध्ये “पालक संघर्ष समितीच्या “वतीने आंदोलन केले होते.

उपोषणाच्या अनुषंगाने मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे आणि तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी मध्यस्थी करून आवाजवी फि संदर्भामध्ये दि ३०/१२/२०२० रोजी  वडगाव मावळ येथे सर्व संस्थाचालक/संचालक मंडळ यांची बैठक बोलावून त्यामध्ये निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आले होते. याबाबत बुधवार (दि 30) बैठक झाली होती.

 यामध्ये मावळ तालुका इंग्लिश मिडीयम स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे, सह्याद्रि इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक,गणेश भेगडे, बालविकास विद्यालयाचे सुरेश चौधरी,मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष गणेश खांडगे, जैन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष प्रकाश ओसवाल, कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष संदीप काकडे,कांतीलाल शाह स्कूल, माउंट सेंट, हचिंग इंग्लिश  मिडीयम स्कूल,इंद्रायणी इंग्लिश मिडीयम स्कूल ,, सरस्वती विद्यालयाचे  सुरेश झेंड आदी 24 शाळांचे प्रतिनिधी होते.

पालक संघर्ष समिती तर्फे नगरसेवक अरुण बबनराव माने.(पालकजैन इंग्लिश स्कूल) आर टी आय कार्यकर्ते जमीर नालबंद, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष आशिष खांडगे,शहर राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्षा अर्चना दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते जयवंत कदम, व इतर पालक उपस्थितीत  होते. साधकबाधक चर्चा होऊन एक मध्यमार्ग म्हणून सर्व अवाजवी फी कमी करून फक्त ट्युशन फी घेण्यात यावी, असा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत झाला.

मीटिंगमध्ये तळेगाव मधील सर्व संस्थाचालक आणि मुख्याध्यापक  त्याचप्रमाणे पालक संघर्ष समिती च्या वतीने पालक   उपस्थित होते. या मीटिंगमध्ये  अनेक विषयावर चर्चा विनिमय झाली. पालक संघटनेच्यावतीनेसंस्था चालकांना पूर्ण फी माफ करण्याची पहिल्यापासून आपण  आग्रही भूमिका/ मागणी लावून धरली होती .परंतु तहसिलदार आणि गट शिक्षण अधिकारी यांनी  सांगितल्याप्रमाणे शासनाच्या परिपत्रक प्रमाणे. कमीत कमी फि घेण्यासाठी आपण संस्थाचालकांना विनंतीकरून आग्रह केला, .परंतु संस्थाचालक त्यांच्या भूमिकेवर ठाम होते.

पालक संघर्ष समिती देखील आपल्या भुमिकेवर ठाम असताना ,एक मध्यम मार्ग म्हणून चर्चेच्या माध्यमातून सर्व अनावश्यक फि कमी  करून फक्त ट्युशन फी भरण्यात यावी असा निर्णय झाला व तो निर्णय मा तहसीलदार मधुसूदन बर्गे व गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे  यांनी जाहीर केला.

या निर्णयाचे स्वागत संस्था चालक ,पालक संघर्ष समिती यांचे चर्चेतून तोडगा निघाला असल्याने सर्व संस्थाचालक देखील त्या निर्णयाला संमत झालेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.