Pimpri News: महापालिका रुग्णालयांतील वैद्यकीय सेवांच खासगीकरण!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचव डमहापालिकेच्या विविध रुग्णालयांत खासगी एजन्सीमार्फत मनुष्यबळ पुरविण्यास मंजुरी दिल्यानंतर आता सोनोग्राफी, एमआरआय, सीटी स्कॅन, लॅब, एक्स रे, पॅथॉलाजी विभाग, डायलिसिस आणि स्त्रीरोग यंत्राद्वारे तपासणी करण्याचे काम खासगी एजन्सीला देण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे. त्यासाठी खासगी संस्थांना रुग्णालयांत जागा, वीज आणि पाणी मोफत उपलब्ध करुन दिले जाणार आहे. दरम्यान, खासगी करणाला विविध संघटनाकडून विरोध होता आहे.

पिंपरी कॅम्पातील नवीन जिजामाता रुग्णालयात एमआरआय, सीटी स्कॅन,  लॅब, एक्स रे, पॅथॉलाजी विभाग खासगी भागीदारीतून ‘ट्रस्ट हेल्थ केअर फाउंडेशन’द्वारे सुरु करण्यात येणार आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य विमा योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना मिळून एमआरआय लॅबच्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.

तसेच, आर्थिकदृष्या दुर्बल घटकांना त्याचा लाभ मिळणार आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या दरानुसार ‘ट्रस्ट हेल्थ केअर फाउंडेशन विविध तपासण्यांसाठी दर आकारणार आहे. त्यासाठी रुग्णालयात प्रयोगशाळा, एमआरआय, सीटी स्कॅन, लॅब, एक्स रे साठी महापालिका विनामूल्य जागा तसेच, वीज आणि पाणी उपलब्ध करुन देणार आहे.

महापालिकेच्या विविध 8 रुग्णालयांसाठी स्त्रीरोग विभागासाठी सर्विकोस्कोपचे 10 उपकरणे भांडार विभागाने खरेदी केले आहेत. ती उपकरणांच्या संचलनाव्दारे महिला रुग्णांची तपासणी करण्याचे काम खासगी संस्था करणार आहे.ती उपकरणे वापरासाठी प्रशिक्षित स्त्रीरोग तज्ज्ञ आणि परिचारिका पुरविण्याचे काम एजन्सी करणार आहे.त्यास उपसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली.

थेरगाव रुग्णालयात मोफत डायलीसीस सेंटर सुरु करण्याच्या ओम जय आनंद चॅरिटेबल ट्रस्टचा प्रस्ताव स्थायी समितीने 11 ऑगस्टला मंजूर केला होता. तथापि, सप्टेंबरच्या महासभेत हा प्रस्ताव दप्तरी दाखल करुन नव्याच संस्थेला सेंटर चालविण्यास देण्यास उपसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली. आता, पुण्यातील किडनी केअर डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून डायलिसिस केले जाणार आहे.

राजीव गांधी जीवनदायी योजना, आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले योजनेचा लाभ गरीब रुग्णांना मिळवून मोफत डायलिसिस केले जाणार आहे. डायलिसिस सेंटरसाठी रुग्णालयात मोफत जागा तसेच वीज आणि पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे.या प्रस्तावाला उपसूनचनेद्वारे मंजुरी देण्यात आली.

सांगवीतील इंदिरा प्रसुतीगृह रुग्णालयात सोनोग्राफी , एक्स रे, पॅथॉलॉजी, विभाग लाईफ केअर मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालयातर्फे सुरु करण्यात येणार आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या दराने रुग्णांलयाकडून शुल्क आकारणी केली जाणार आहे. त्यासाठी रुग्णालयात जागा तसेच, पाणी आणि वीज मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.त्यास उपसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.