Priyanka and her Mother-in-Law : काय प्रियांकाच्या दो-या चक्क सासूच्या हातात…

Priyanka Chopra's mother-in-law's birthday celebrated today

एमपीसी न्यूज – आपल्या सर्वांची पीसी म्हणजे प्रियांका चोप्रा सध्या तिच्या सासरी मजेत आहे. बॉलिवूडच्या लाडक्या पिगी चॉप्सने निक जोनास बरोबर लग्न करुन डायरेक्ट अमेरिकाच गाठली. बॉलिवूडमध्ये कारकीर्द बहरात असतानाच तिला हॉलिवूड गाजवण्याची देखील उत्तम संधी मिळाली. आणि तिने त्या संधीचे सोने केले. सध्या तिचे बॉलिवूडमधील फार कमी प्रोजेक्ट सुरु आहेत. काही वर्षांपूर्वी तिने ‘व्हेंटिलेटर’ हा मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. यात तिने स्वत: गायलेल्या ‘बाबा’ या गाण्याला भरभरुन दाद मिळाली.

प्रियांका इन्स्टाग्रामवर पण कायम अ‍ॅक्टिव्ह असते. नुकत्याच तिने तिच्या सासूबाई डेनिस मिलर जोनास यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. प्रियांकाने इन्स्टाग्रामवर त्यांच्यासोबत फोटो शेअर करत ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा! मला आनंद आहे तुम्ही आज इथे आमच्यासोबत आहात आणि आपण तुमचा वाढदिवस एकत्र साजरा करत आहोत’ असे कॅप्शन शेअर केले होते. पण सध्या सोशल मीडियावर त्या दोघींचा दुसरा एक व्हिडीओ चर्चेत आहे.

View this post on Instagram

Love you mom. Happy birthday! 🎂

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

या व्हिडीओमध्ये प्रियांका आणि तिच्या सासूबाई मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्रा घोड्यासारखी खिंकाळताना आणि धावताना दिसते आहे. तर तिच्या सासूबाई तिचा ड्रेस पकडून घोडेस्वारी करत असल्याचे दिसत आहे. म्हणजे जणू काही प्रियांकाच्या दो-या तिच्या सासूच्या हातात आहेत. प्रियांकाचा हा व्हिडिओ बघून भारतीय सासवा मात्र खूष होतील. कारण प्रियांकाची सासू हे गंमतीसाठी करत आहे. मात्र हे प्रतिकात्मक असले तरी सुनेच्या दो-या आपल्या हातात आहेत म्हटल्यावर कोणत्याही भारतीय सासूला आनंदच होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.