Talegaon Dabhade : तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगायन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व मावळ नागरी सह पतसंस्था मर्यादित तळेगाव स्टेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगायन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (दि. 21) संपन्न झाला.

पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी देखील स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली व मावळ तालुका गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.

या प्रसंगी रो.क्लब तळेगाव एमआयडीसी संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, रो.क्लब तळेगाव एमआयडीसीच्या अध्यक्षा सुमती निलवे, उपाध्यक्ष रो. विल्सन सालेर, माजी अध्यक्ष रो शंकरगौडा हदिमानी,

सचिव प्रविण भोसले, मावळ नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे, सचिव विलास टकले, रो. प्रकल्प प्रमुख रो. मिलिंद शेलार सर,रो सचिव कोळवणकर, रो पांडुरंग पोटे, रो लक्ष्मण मखर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, अब्राहम लिंकन,संत तुकडोजी महाराज या महापुरुषांचे विचार मैदानात जाऊन मुलांनी खेळले पाहिजे; स्पर्धेत भाग घेऊन स्वतःचा विकास केला पाहिजे. महापुरुषांचा वारसा पुढे चालवत विद्यार्थी देश बलवान करतील असे मत आपल्या मनोगतातून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी  व्यक्त केले.

याप्रसंगी मावळ नागरी सह पतसंस्थेचे कार्याध्यक्ष  सुनील नाना भोंगाडे यांच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी साहेब यांचा सत्कार शाल, मानचिन्ह व रोप देऊन करण्यात आला.

याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 द्वारा आयोजित वाइन चाणक्य फायनान्स लिटरसी प्रोग्राम अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडेचे 130 विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. रो. अध्यक्षा सुमती निलवे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत शिक्षकांसाठीही ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले होते ; त्यांचे प्रमाणपत्र वितरण समारंभ  प्रातिनिधिक स्वरूपात घेण्यात आला. शिवाजी विद्यालय देहूरोड येथील कलाशिक्षक मिलिंद शेलार सर व स्वामी विवेकानंद स्कूलच्या पर्यवेक्षिका रेणू शर्मा  यांना सन्मानित करण्यात आले.

निकाल खालीलप्रमाणे: 

इयत्ताआठवी ते दहावी गट

प्रथम क्रमांक – साईराज तसनूसे नवीन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे

 द्वितीय क्रमांक –  श्रेया घरदाळे पवना विद्यालय पवनानगर

तृतीय क्रमांक – तमन्ना सय्यद अ‍ॅड. पु वा परांजपे विद्यालय

उत्तेजनार्थ – लयकाशा चांदबाशा शेख कन्या शाळा क्र. 4 तळेगाव दाभाडे.

इयत्ता पाचवी ते सातवी गट

प्रथम क्रमांक- रुद्राक्ष चेतन जाधव कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल  द्वितीय क्रमांक – सृष्टी विनय खानसोळे स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे

तृतीय क्रमांक – अथर्व ढोरे प्रगती विद्या मंदिर इंदोरी

उत्तेजनार्थ – कावेरी ठाकर पवना विद्यालय पवनानगर.

पहिली ते चौथी गट 

प्रथम क्रमांक –  निकुंज शरणागत जिल्हा परिषद शाळा दत्तवाडी नेरे मुळशी

द्वितीय क्रमांक –  स्वरा राहुल पवार स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे तृतीय क्रमांक-  श्रेयस महाले आदर्श विद्यालय तळेगाव दाभाडे.

उत्तेजनार्थ – श्रीयुक्त जगताप माउंट सेंट स्कूल तळेगाव दाभाडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.