Lohagad News : लोहगड अभ्यास दौरा व दुर्ग बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

एमपीसी न्यूज – विश्व हिंदू परिषद बजरंग दल सुदूंबरे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या दुर्ग बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण व लोहगड अभ्यास दौरा उत्साहात पार पडला. रविवारी (दि.21) झालेल्या या अभ्यास दौ-यात शालेय विद्यार्थी यांच्यासह 66 जण सहभागी झाले होते.

लोहगड किल्ल्यावर प्रस्थान करण्यापूर्वी लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला शिवस्मारकास लोहगडवाडीचे सरपंच नागेश मरगळे, उपसरपंच गणपत ढाकोळ भाजपचे दत्ता गाडे यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केला. गडावर पोहचल्यानंतर लोहगड विसापूर मंचचे संदिप गाडे यांनी मुलांना गड किल्ल्यांची माहिती दिली.

लोहगड अभ्यास दौऱ्याचे नियोजन बजरंग दलाचे राहुल गाडे, स्वप्निल आंबोले, गणेश काळडोके, विकास काळोखे, विश्वनाथ गाडे, प्रविण शेळके, अक्षय खोल्लम, गजानन गाडे, सुयश काळोखे, दर्शन गाडे, ऋषिकेश कुसुमकर, कुणाल गाडे, गौरव सुर्यवंशी, संकेत गाडे, आदिनाथ कुसुमकर, महेश बाळसराफ, अनिकेत होनावळे, हर्षल गाडे यांनी केले. सहलीसाठी बस व्यवस्था राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उत्तम गाडे यांनी केले.

दुर्ग बनवा स्पर्धेतील विजेत्यांची नावे

प्रथम क्रमांक – मोनाली माणिक गाडे आणि अभिषेक दत्तात्रय गाडे, सिद्धांत रविंद्र खेडेकर
द्वितीय क्रमांक – सार्थक संतोष गाडे, अथर्व शरद गाडे
तृतीय क्रमांक – सोहम संतोष साळुंखे, राजनंदिनी राजेंद्र पाटील

विजेत्यांना मावळ तालुक्यातील गड किल्याचा इतिहास सांगणारे डॉ. प्रमोद बोराडे लिखित ‘मावळची शौर्यगाथा’ या पुस्तकाची प्रत, सन्मानपत्र व रोख रक्कम देण्यात आली.

उत्तेजनार्थ विजेता विरेन संतोष दरेकर आणि शिवराज संताजी गाडे यांना शिव प्रतिमा व मावाळची शौर्यगाथा पुस्तक व सन्मानपत्र देण्यात आले. स्पर्धेतील उर्वरित सर्व सहभागी स्पर्धकांना बजरंग दला कडून सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.