Vadgaon Maval : राष्ट्रवादी निबंध स्पर्धेचा शुक्रवारी पारितोषिक वितरण समारंभ : बबनराव भेगडे

अमीन खान, शबनम खान, महेश भागीवंत, प्रभाकर तुमकर, माधुरी पवार विजेते

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वैचारिक निबंध स्पर्धेतील विजेत्यांना येत्या शुक्रवारी (६ नोव्हेंबर) वडगाव मावळ येथे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.  या बाबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी माहिती दिली. मावळ तालुक्यातून पत्रकार अमीन खान यांना प्रथम तर जिल्हास्तरावर उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. 

तालुकास्तरावरील विजेत्यांत व्दितीय क्रमांक सामाजिक कार्यकर्त्या शबनम खान, तृतीय क्रमांक महेश भागीवंत यांना तर  प्रभाकर तुमकर आणि माधुरी पवार यांना उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाले आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार सुनील शेळके, तालुका अध्यक्ष  बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यास्पर्धेत विक्रमी संख्येने  288 लेखकांनी भाग घेतला होता. मावळ तालुक्यातून  अमीन खान यांनी राजकीय विषयावर भाष्य केलेल्या ‘कोरोना क्रांतीचा वेध’ या लेखाची सर्वोत्कष्ट लेखनासाठी प्रथम क्रमांकासाठी निवड झाली आहे. महिलांच्या जगण्याच्या विषयावर ‘तिला उभारी दिली तर..’ या लेखासाठी शबनम खान यांना व्दितीय क्रमांक मिळाला. ‘कोविड लॉकडाऊनमुळे शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने आणि उपाययोजना’ विषयावर महेश भागीवंत यांनी लिहिलेल्या लेखास तिसरा क्रमांक मिळाला आहे. प्रभाकर तुमकर यांनी कोरोनाकाळातील ‘पंढरीची वारी’ या विषयावर लिहिलेल्या लेखास उत्तेजनार्थ पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे.  परीक्षक म्हणून डॉ. मेदिनी डिंगरे, डॉ. अशोक गिरी आणि धर्मराज पाटील यांनी काम पाहिले.

सर्व विजेत्यांनी समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण ब्लाॅकचे अध्यक्ष  सुभाष जाधव, कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, युवक अध्यक्ष  सुनील दाभाडे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुवर्णा राऊत या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.