FIR Procedure : FIR प्रक्रिया प्रत्यक्षरित्या कशी पार पडते ? जाणून घ्या FIR प्रक्रियेतील 8 पाय-या

एमपीसी न्यूज – पोलीस आणि पोलीस स्टेशनच्या प्रक्रियेपासून आपण सहसा दोन हात लांबच राहत असतो. त्यात FIR वगैरे भानगड लांबच ! पण, या गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. यासाठीच पुणे पोलिसांनी ‘नो युवर राईटस्’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत पोलिसांनी FIR प्रक्रिया प्रत्यक्षरित्या कशी पार पडते, त्याच्या 8 पाय-या कोणत्या याबाबत माहिती दिली आहे.

पोलीस स्टेशन किंवा चौकीत जाण्यापासून ते तुमच्या हातात तक्रारीची प्रत मिळेपर्यंत FIR प्रक्रिया प्रत्यक्षरित्या कशी पार पडते याबाबत पुणे पोलिसांनी 8 पाय-या सांगितल्या आहेत.

FIR प्रक्रियेतील आठ पाय-या खालीलप्रमाणे – 

  • तुम्ही गुन्ह्याची माहिती ज्यांच्या न्यायाधिकारक्षेत्रात नोंदवायची आहे त्या जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा चौकीत जावे.
  • फ्रंट डेस्कवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घटना सविस्तपणे सांगा.
  • तो हस्तलिखित जबाब सीसीटीएनएस (क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम) प्रणालीच्या ऑपरेटरला दिले जाते. तेथे अधिकृतपणे एफआयआर नोंदवली जाते.
  • कॉन्स्टेबलने दिलेले हस्तलिखित सीसीटीएनएस ऑपरेटर टाईप करते तसेच योग्य आयपीसी (IPC) कलमांची निवड करते आणि आढावा घेण्यासाठी एफआयआर प्रत तयार करते.
  • यानंतर सीसीटीएनएस ऑपरेटर एफआयआरची प्रिंट काढते आणि पुढील प्रक्रियेसाठी संबंधित कॉन्स्टेबलकडे लेखी जबाब आणि ती प्रत देते.
  • कॉन्स्टेबल ही प्रत पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांकडे देतो. ते एफआयआर वाचून त्यातील कलमं किंवा इतर काही दुरूस्ती असेल तर सुचवली जातात.
  • यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तक्रारदार आपल्या तक्रारीची (FIR) प्रत घेण्यासाठी येतो.
  • एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलीस कर्मचारी तुम्हाला या तक्रारीबाबत काही घडामोडी घडल्या तर माहिती देतात. तुम्ही देखील काही शंका असेल तर दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करून एफआयआर क्रमांक सांगत माहिती घेऊ शकता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.