Vadgaon Maval : फत्तेशिकस्त चित्रपटाच्या शूटिंगसाठी मिळालेली रक्कम तिकोणागड संवर्धनाकरिता वर्ग

एमपीसी न्यूज – फत्तेशिकस्त चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सहकार्य केल्याबद्दल वडगावातील मोरया ढोल ताशा व जय मल्हार पथक यांना दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी दिलेले 30 हजार रुपये ढोल ताशा पथकाकडून तिकोणागडाच्या संवर्धनासाठी दान केली. गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ यांना ही रक्कम सुपूर्त करण्यात आली. 

शिवभक्तांचा बहुचर्चित फत्तेशिकस्त हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याला शिवभक्त व इतिहास प्रेमी भरभरून प्रतिसाद देताना दिसून येत आहेत. तसेच तो चित्रपट दुसऱ्यांनीही आवर्जुन पहावा, असेही सांगत आहेत.

फत्तेशिकस्त चित्रपटातील शाहिस्तेखानाची फजिती झाल्यानंतर विजय उत्सव प्रसंगाचे गाणे चित्रित करायचे होते. त्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना त्या प्रसंगात ढोल ताशा पथकाची गरज होती. त्यांनी काही ढोल ताशा पथकांस विचारणा केली. मात्र अनेकांनी त्यांना या कामासाठी मोठी रकम मागितली. एवढी मोठी रकम देणे शक्य नव्हते.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे पदाधिकारी गणेश जाधव यांना लांजेकर यांनी चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणासाठी ढोल ताशा पथकाची गरज आहे, असे सांगितले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा चित्रपट असल्याने वडगावातील मोरया ढोल ताशा पथक व जय मल्हार पथक हे विनामुल्य सहकार्य करावयास तयार झाले.

मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात “रणी फडकते लाखो झेंडे” या गाण्याचे चित्रीकरण दोन दिवस पार पडले. यात वडगाव मावळ मधील सुमारे १०० जनांनी मावळ्याच्या वेशात सहभाग घेतला होता.

गाण्याच्या चित्रीकरणानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी स्व खुशीने वडगावच्या मोरया व जय मल्हार या ढोल ताशा पथकास तीस हजार रुपये दिले. मात्र दोन्ही पथकांनी हे रुपये छत्रपती शिवराय यांच्या चित्रपटाच्या वेळी मिळाल्याने ती रकम तिकोणागड दुर्गसंवर्धनासाठी देण्याचे ठरवून वडगाव मावळ दुर्गसंवर्धन संस्थेला सुपूर्त केले. या निधीतून तिकोणागडाचा विकास केला जाणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.