Bhosari : ……अन्‌ आमदार महेशदादांनी डान्स करत गोविदांना दिले प्रोत्साहन (व्हिडीओ)

एमपीसी न्यूज – तरुणाच्या गळ्यातील ताईत असलेले आणि विविध कारणांनी सतत चर्चेत राहणारे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दहीहंडीच्या उत्सावात आमदार दादांनी डान्स करत गोविंदाना हंडी फोडण्यास प्रोत्साहन दिले. दादांचा डान्स केलेला ‘व्हिडीओ’ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला असून भोसरी परिसरात त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. 

भोसरीतील भैरवनाथ कबड्डी संघाच्या वतीने सोमवारी (दि.3) दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडीच्या कार्यक्रमात आमदार दादा देखील सहभागी झाले होते. दहीहंडीचा जल्लोष वाढत चालला होता. तरुणाई डिजेच्या तालावर नाचण्यात दंग झाली होती. आमदार दादांनी देखील डान्स करण्यास सुरुवात केली. तरुणांमध्ये जल्लोष भरला. दादांनी डान्स करत गोविंदाना प्रोत्साहन दिले.

आमदार दादा हे तरुणांच्या गळ्यातील ताईत असून, तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. दादांचा डान्स केलेला ‘व्हिडीओ’ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला असून भोसरी परिसरात त्यांच्या डान्सची जोरदार चर्चा सुरु आहे.

https://www.youtube.com/watch?v=g_BrpV__Pfk&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.