Promotion PSI To API News : राज्यातील 539 पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक निरीक्षक पदावर बढती

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य पोलीस सेवेतील 539 पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक निरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) कुलवंत कुमार सारंगल यांनी बुधवारी (दि. 28) दिला आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील 12 अधिकारी आहेत. तर राज्यातून पिंपरी चिंचवड शहरात 14 अधिकारी बढतीवर बदलून आले आहेत.
राज्य पोलीस दलातील उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार बढती देण्यात आली आहे. त्यांना सध्याच्या ठिकाणावरून तात्काळ कार्यामुक्त करून नवीन बदलीच्या ठिकाणी उपलब्ध जागेनुसार रुजू करून घेण्याचे संबंधित पोलीस प्रमुखांना आदेश देण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील बढती मिळालेले अधिकारी (बढतीवर बदलीचे ठिकाण) –
प्रसाद सुरेश दळवी (पिंपरी-चिंचवड)
मनीषा महादेव बनसोडे / मनीषा शिवाजी हाबळे (पिंपरी-चिंचवड)
हानमंत हरीचंद्र मिटके (नांदेड परिक्षेत्र)
उत्कर्षा प्रमोद देशमुख (कोकण परिक्षेत्र)
प्रशांत हनुमंत साबळे (नागपूर शहर)
शरद निवृत्ती अहेर (अमरावती परिक्षेत्र)
महेंद्र दिलीप पाटील (नागपूर शहर)
अरविंदकुमार भीमराव हिंगोले (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)
महेंद्र कारभारी आहेर (नागपूर शहर)
विठ्ठल बाबासाहेब बढे (ठाणे शहर)
प्रमोद रमकृष्ण कटोरे (नाशिक परिक्षेत्र)
संजय धोंडीराम निलपत्रेवार (नांदेड परिक्षेत्र)

बढतीवर पिंपरी चिंचवड शहरात आलेले पोलीस अधिकारी (बदलून आलेले ठिकाण) –
तौफिक युसूफ सय्यद (मीरा-भाईंदर)
नारायण आनंदराव पाटील (मुंबई शहर)
कल्याण नारायण घाडगे (मुंबई शहर)
संदीप आप्पासाहेब देशमुख (पुणे शहर)
मनोजकुमार रामबली पांडे (हिंगोली)
सिद्धनाथ भगवान बाबर (पुणे शहर / अमरावती परिक्षेत्र)
स्वप्नाली दत्तात्रय पलांडे (मीरा भाईंदर)
वर्षा नारायण जगदाळे (सांगली)
पूनम दादासाहेब जाधव (पुणे ग्रामीण)
सीमा सुरेश मुंडे (पुणे ग्रामीण)
राजश्री छगन खैरनार / राजश्री गणेश पावरा (मुंबई शहर)
प्रमिला पांडुरंग क्षीरसागर (पुणे शहर)
लुईस अँथोनी मकासरे (पुणे शहर)
रमेश पंडित यादवडे (पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज दौंड)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.