Pimpri News: महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बढती

पुढील आदेशापर्यंत महापालिकेतच कामाचे आदेश

एमपीसी न्यूजपिंपरीचिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सध्याच्या पदावर स्थानापन्न पदोन्नती देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2021 पासून पदोन्नती देण्यात येत आहेपुढील आदेश येईपर्यंत महापालिकेच्या आयुक्तपदावर काम करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले. या बाबतचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.

श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा 27 एप्रिल 2017 रोजी कार्यभार हाती घेतला होता.  त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आल्याने त्यांची तत्काळ बदली होईल, असे मानले जात होते. पण, कोरोना महामारी आली. संकटाच्या काळात सरकारने अधिका-यांच्या बदल्या केल्या नाहीत. त्यामुळे तीन वर्षांची मुदत संपल्यानंतरही त्यांना मुदतवाढ देण्यात आली. कोरोना काळात आयुक्तांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली.

आयुक्तांना बढती मिळाल्यानंतर बदली होईल, असे मानले जात होते. आयुक्तांना बढती मिळाली. सध्याच्या पदावर स्थानापन्न पदोन्नती देण्यात आली आहे. सध्याचे पद भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकालिक वेतनश्रेणीत उन्नत करून पुढे चालू ठेवण्यात आले आहे. 1 जानेवारी 2021 पासून पदोन्नती देण्यात येत आहे. पण, बदली झाली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे हर्डीकर यांना आणखी काही दिवस महापालिकेतच ठेवू इच्छित आहेत. त्यामुळे आणखी तीन महिने आयुक्त हर्डीकर पालिकेतच राहण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.