Pimpri : प्रचाराचा सुपर संडे!

निवडणुकीच्या धामधुमीतील शेवटचा रविवार जोरदार प्रचाराचा

एमपीसी न्यूज – पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील महायुती आणि महाआघाडी, पुरस्कृत उमेदवारांनी आजच्या प्रचाराच्या शेवटच्या सुट्टीच्या रविवारच निमित्त साधत जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यावर भर दिला.  भेटी-गाठी, रॅली, पदयात्रा, कोपरा सभा घेत शेवटच्या रविवारी जोरदार प्रचार केला.

विधानसभा निवडणुकीसाठी पुढील सोमवारी (दि. 21)मतदान होणार आहे. शनिवारी (दि.19) प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी केवळ सहा दिवस राहिले असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. शेवटच्या दिवसात नेते प्रचाराला झाडून उतरणार आहेत. प्रचारफेरी, रॅली, पदयात्रा काढण्याचे नियोजन केले जात आहे.  शेवटच्या मतदारापर्यंत पोहचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न असणार आहे. येत्या आठवड्यात सभांचा, पदयात्राचा धडाका होईल.

पिंपरी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार आणि महाआघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी मतदारांच्या भेटी-गाठी घेण्यावर भर दिला. सुट्टी असल्याने घरोघरी जावून प्रचार करण्याला महत्व दिले.

चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची थेरगाव येथे सभा झाली. तर, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, सांगवी, नवी सांगवी परिसरात जोरदार रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले.

भोसरीचे महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी तळवडे, चिखली, जाधववाडी, मोशी, च-होली परिसरातील मतदारांच्या भेटी-गाठी घेतल्या. तसेच सोसायटी फेडरेशनेची बैठक घेतली. भोसरीचे अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी मासुळकर, अजमेरा कॉलनी, नेहरुनगर परिसरात मोठी पदयात्रा काढली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.