Domestic Violence : विवाहितेचा छळ करून आत्महत्येस केले प्रवृत्त; पती आणि सासूला अटक

एमपीसी न्यूज – विवाहितेचा छळ (Domestic Violence) करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिच्या पती आणि सासूला अटक करण्यात आली आहे. याबाबत मयत विवाहितेच्या वडिलांनी – सुरेश भालेराव यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी तिचे पती मिलिंद कांबळे, वय 35 वर्षे व सासू, रा. साईनगर, मामूर्डी यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना अटक करण्यात आली आहे.

सन 2015 ते 26 जून 2022 पर्यंत वेळोवेळी आरोपींनी फिर्यादीची 32 वर्षीय मुलीस शिवीगाळ, मारहाण करून, अपमानकारक वागणूक देऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला क्रूर वागणूक (Domestic Violence) देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.

Bavdhan Murder Case : बांधकाम कामगाराचा खून करण्यास अटक

त्यामुळे फिर्यादीच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, आरोपिंविरोधात भा. द. वि कलम 498(अ), 306, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.