Talegoan : योग्य प्रशिक्षण घेतले तर व्यवसाय वृद्धींगत होण्यास मदत होते आणि जीवनमान उंचावते- ज्योती भोसले

एमपीसी न्यूज – “योग्य प्रशिक्षण घेतले तर व्यवसाय वृद्धींगत होण्यास मदत होते आणि जीवनमान उंचावते” असे मत पिंपरी-चिंचवड महानगर पालिका शहरी जीवन्नोत्री अभियान (NULM) च्या शहर अभियान व्यवस्थापिका ज्योती भोसले यांनी केले.

तळेगाव दाभाडे येथील रूडसेट संस्था आयोजित उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. या कार्यक्रमास रूडसेट संस्थाचे संचालक जयंत घोंगडे, प्रशिक्षक संदीप पाटील व हरीश बवचे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहरी जीवन्नोत्री अभियानचे समूह संघटक उपस्थित होते.

भारत सरकारच्या शहरी विभागच्या वतीने जीवन्नोत्री अभियान(NULM) मार्फत जीवनस्तर उंचावणे या अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या प्रशिक्षण कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महानगरपालिका वतीने प्रशिक्षणार्थींना पाठवण्यात आले आहे.

याप्रसंगी रूडसेट संस्थाचे संचालक जयंत घोंगडे यांनी प्रशिक्षण का महत्त्वाचे आहे तर शासनाच्या विविध योजनेचा विनियोग योग्य रीतीने व्हावा हा उद्देश असूनही एक मिळालेली संधी असून संधीचा सदुपयोग करा आणि जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करा. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप पाटील यांनी केले तर आभार हरीश बावचे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीसाठी योगिता गरुड, दिनेश निळकंठ व रवी घोजगे यांनी विशेष सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.