Kivle : वेश्या व्यवसाय चालणा-या हॉटेलवर छापा; चौघांना अटक 12 महिलांची सुटका

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी

एमपीसी न्यूज – किवळे परिसरात साई लॉज येथे छापा टाकून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने 12 महिलांची सुटका केली. तसेच एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 2 लाख 50 हजार रुपये किमतीची वाहने जप्त केली आहेत. ही कारवाई गुरुवारी (दि. 4) करण्यात आली.

हरीश सिन्ही शेट्टी (वय 46), अभिषेक मोहन शेट्टी (वय 32, दोघे रा. साई लॉज, किवळे), रत्नाबहाद्दूर रनबहाद्दूर प्रधान (वय 34, रा. भोंडवेवस्ती, रावेत), बालाजी रामराव माने (वय 25, रा. सोमाटणे फाटा), शेखर दीपक सांडभोर (रा. किवळे), प्रविण शेट्टी (रा. साई लॉज, किवळे), सागर भोंडवे, विनोद सदानंद शर्मा (दोघे रा. भोंडवेवस्ती, रावेत) यांचं विरोधात स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरीश, अभिषेक, रत्नाबहाद्दूर आणि बालाजी यांना पोलिसांनी अटक केली असून अन्य चौघेजण फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे परिसरात साई लॉज येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे काही कर्मचा-यांनी वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी वापरण्यात येणा-या वाहनांची माहिती मिळवली. तसेच या लॉजवर डमी गिऱ्हाईक म्हणून पाठवून सापळा रचला. या छाप्यामध्ये तीन मुलींची सुटका केली. या छाप्यात हरीश आणि अभिषेक यांना अटक केली. त्या दोघांकडे चौकशी करत वेश्या व्यवसाय करणा-या मुलींची माहिती काढली. भोंडवेवस्ती मधील मुस्कान फर्निचर दुकानाच्या मागच्या बाजूला या मुली राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून नऊ मुलींची सुटका केली. तसेच या मुलींची ने-आण करणा-या बालाजी आणि शेखर यांना अटक केली. तर लॉजचा मालक शेखर, चालक प्रवीण, घर मालक सागर, भाडेकरू विनोद हे चौघेजण अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी मायक्रा कार, अॅक्सिस मोपेड आणि एक हिरो होंडा मोटारसायकल असा एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, युनिट एकचे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे, सहाय्यक पोलीस फौजदार भीवसेन सांडभोर, दीपक लोखंडे, पोलीस हवालदार प्रमोद वेताळ, कैलास बोबडे, राजेश परंडवाल, संतोष बर्गे, प्रमोद लांडे, आप्पा कारकुड, राजेंद्र शेटे, पोलीस नाईक अमित गायकवाड, हेमंत खरात, पोलीस शिपाई प्रमोद हिरळकर, सुनील चौधरी, प्रदीप गाडे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.