Wakad Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

दोन महिलांवर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणा-या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे वस्ती, वाकड याठिकाणी सॉलिटेअर बिझनेस हब मध्ये सामजिक सुरक्षा विभागाने गुरुवारी (दि.01) हि कारवाई केली. 

याप्रकरणी स्पा सेंटर मालक जया राकेश यादव (वय 40, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) व स्पा मॅनेजर खुशी सैनप्पा शिंदे (वय 23, रा. काळेवाडी, वाकड) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 370 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपी ह्या कस्पटे वस्ती, वाकड येथील सॉलिटेअर बिझनेस हब मध्ये स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली अवैध पद्धतीने वेश्याव्यवसाय चालवत होत्या. सामजिक सुरक्षा विभागाने गुरुवारी (दि.01) याठिकाणी छापा टाकून चार महिलांची सुटका केली. तसेच साडे चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.