Pune : फर्ग्युसनमध्ये माजी न्यायमूर्ती बी. जी.कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाला विरोध

एमपीसी न्यूज – फर्ग्युसन महाविद्यालयात माजी न्यायमूर्ती बी. जे.कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाला आज सोमवारी (दि.21) आज काही विद्यार्थ्यांनी विरोध केला.

राजमाता जिजाऊ जयंती, युवक सप्ताह आणि महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘भारतीय राज्यघटना’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज सोमवारी (दि.21) दुपारी 12 ते 3 या वेळेत बी. जी. कोळसे पाटील यांना बोलावण्यात आले होते. याबाबत विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी करत सर्व परवानग्या देखील मिळविल्या होत्या. परंतु आज अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता काही विद्यार्थी संघटनेने याचा विरोध दर्शविला. त्यामुळे महाविद्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.