pimpri : भोसरी हॉस्पिटल खासगी संस्थेस देण्यास विरोध

नागरी हक्क सुरक्षा समिती आणि इतर समविचारी पक्ष, सामाजिक संघटना यांच्यातर्फे निदर्शने

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी येथे नव्याने बांधण्यात आलेले हॉस्पिटल खासगी संस्थेस देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या या लोकविरोधी निर्णयाला विरोध करण्यासाठी नागरी हक्क सुरक्षा समिती आणि इतर समविचारी पक्ष, सामाजिक संघटना यांच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आणि निदर्शने आंदोलन करण्यात आले.

भोसरीतील हॉस्पिटल खासगी संस्थेस चालविण्यास देण्याचा निर्णयाने शहरातील सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात आणि सहज वैद्यकीय सेवा मिळणे अशक्य होईल.

या विरोधात शेतकरी कामगार पक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती, स्वराज अभियान आणि इतर सामाजिक संघटना, मानव कांबळे, प्रदीप पवार, गिरीश वाघमारे, निरजकुमार कडू, हरीश मोरे, नितीन बनसोडे, छायावती देसले, आनंदा कुदळे, सुरेश गायकवाड, वैजनाथ शिरसाट, धम्मराज साळवे, संतोष शिंदे, वंदना गायकवाड, दत्ता भोसले, राजेंद्र वाघचौरे, प्रताप गुरव, गणेश दराडे, अपर्णा दराडे सतीश काळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.