Ramdas Kadam : चाकणमध्ये रामदास कदम यांचा निषेध; पोलीस-आंदोलकांत झटापट

एमपीसी न्यूज : राज्याचे माजी मंत्री रामदास कदम (Protest of Ramdas Kadam in Chakan) यांनी केलेल्या वक्तव्याचा खेड तालुका शिवसेनेने निषेध केला आहे. चाकण शहरात माणिक चौकात बुधवारी (दि.21) माजी मंत्री कदम यांच्या प्रतीकात्मक चित्राला जोडे मारून आणि जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला. जोडे मारो आंदोलन करताना पोलिसांनी आंदोलक शिवसैनिकांकडून फ्लेक्स हिसकावून घेतल्याने झटापट झाली.

शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियावर केलेल्या आरोपांचा खेड तालुका शिवसेनेनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत रामदास कदम यांच्या प्रतिमेला पायदळी तुडविले. चाकणमधील माणिक चौक भागात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत हा निषेध नोंदवला. दरम्यान, प्रतिमेला जोडे मारताना पोलिसांनी हस्तक्षेप केला. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक असल्याने महिला पोलीस अधिकारी पुढे सरसावल्या, मात्र पोलिसांच्या हातून फ्लेक्स ओढून पायदळी तुडवण्याचा प्रयत्न महिला शिवसैनिकांनी केला. त्यावर पोलिसांनी हा फ्लेक्स आंदोलकांच्या तावडीतून हिसकावून घेतला.

MPC News Podcast 22 September 2022 : ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

पोलिसांनी अत्यंत शिताफीने आंदोलन (Ramdas Kadam) चिघळू दिले नाही. यावेळी शिवसेनेचे अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, शिवाजी वर्पे, विजया शिंदे, विजया जाधव, नंदा कड, लक्ष्मण जाधव, प्रकाश वाडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते. चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे स्वतः आंदोलनस्थळी ठाण मांडून होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.