Pune : ‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निषेध

एमपीसी न्यूज : दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. पण त्या कार्यक्रमावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा अर्धपुतळा हटविण्यात आला.

Hinjawadi : हिंजवडीत दोन ठिकाणी होर्डिंग कोसळले

त्यावरून विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका करण्यास सुरवात झाली आहे. त्याच दरम्यान पुणे (Pune) येथील स्वारगेट भागातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती बांधुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा निषेध नोंदविला.

यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच सरकार आल्यापासून राज्यपाल,सरकारमधील मंत्री या सर्वांनी महापुरुषांचा अपमान करण्याच काम केले आहे.त्या विरोधात आम्ही सर्वांनी आंदोलन करित सरकारला जाब विचारण्याच काम केले.पण दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्यक्रमा दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा अर्धपुतळा हटविण्यात आला.

ते पुतळे हटविण्याच कोणतेही कारण नव्हते. त्या घटनेचा आम्ही निषेध नोंदवित असून या घटनेला दोन दिवसांचा कालावधी होऊन गेला आहे. पण त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी कोणत्याही प्रकारची भूमिका मांडली नाही. पण आगामी निवडणुकीत राज्यातील जनता त्यांची निश्चित जागा दाखवेल अशी शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टिका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.