Pune News : अर्णब गोस्वामी अटकेच्या विरोधात राज्य सरकारचा निषेध करा

चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन

एमपीसी न्यूज : रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना आज पोलिसांनी अटक केल्यानंतर सोशल मीडिया त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक वर पोस्ट करीत या घटनेचा निषेध नोंदवला. चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना या घटनेचा निषेध नोंदवण्याचे आवाहन केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या पद्धतीने राज्यसरकारचा आंदोलन करून विरोध करा – उपोषण करा, सरकारी कामकाजात असहयोग दाखवा, सोशल मीडियावर आवाज उठवा, मोर्चा काढा असे आवाहन केले आहे. 

 

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये चंद्रकांत पाटील म्हणतात, भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकावता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणी जी केस 2018 सालीच बंद झाली होती ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली.

 

भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो.

 

मी महाराष्ट्रातील जनतेला आणि आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण आपल्या पद्धतीने राज्य  सरकारचा आंदोलन करून विरोध करा – उपोषण करा, सरकारी कामकाजात असहयोग दाखवा, सोशल मीडियावर आवाज उठवा, मोर्चा काढा.

 

काँग्रेस सोबत राहून या सरकारला वाटत आहे की हे महाराष्ट्रात हुकूमशाही पद्धत लागू करू शकतात.. महाराष्ट्र हे कधीच होऊ देणार नाही.

 

आजच्या पिढीला देखील इंदिरा गांधीजींच्या आणीबाणीची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो. त्यावेळी देखील जनतेने सरकारला संविधानाच्या विरुद्ध कारवाई करताना थांबविले होते, आता देखील थांबवणार !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.