Pune : ‘ती’ बस आंदोलकांनी पेटवली नाही ! 

एमपीसी न्यूज – इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पुण्यात एक लिटर पेट्रोलसाठी 88.12 रुपये मोजावे लागत आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असताना दुसरीकडे रुपयाची घसरण सुरूच आहे. मोदी सरकारचे हे अपयश जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून ‘भारत बंद’च्या माध्यमातून केला जात आहे. 

पुण्यात देखील या बंदचे पडसाद उमटायला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. तर पहाटे एका पीएमटी बसला आंदोलकांनी आग लावल्याचा व्हिडिओ समोर आला होता. मात्र, या बसला आग नक्की आंदोलकांनीच का ? याबद्दल संभ्रम होता पण आता रस्त्यावर उभ्या असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसने अचानक पेट घेतल्याची माहिती पीएमपी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पीएमपीच्या बसेस जागेअभावी रात्री रस्त्यावर उभ्या केल्या जातात. कोथरूड आगारासमोर रस्त्यावर उभी असलेली एक बस पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक पेटली. या सुमारास पीएमपीची बससेवा सुरू होते. त्यामुळे ही काही वेळात मार्गावर येणार होती. पण त्यापूर्वीच बस पेटल्याने मोठी दुर्घटना टळली. आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर पीएमपी कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमनच्या जवानांनी काही वेळातच आग विझविली. पण तोपर्यंत अर्धी बस जळून खाक झाली. ही बस खासगी ठेकेदाराची होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बसची पाहणी करून आग कशामुळे लागली हे पाहिले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. असे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सकाळी अगदी वेगाने एका बसला आंदोलकांनी आग लावली म्हणून फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. मात्र आता ही बस पीएमच्या नेहमीच्या भोंगळ कारभारामुळेच पेटली हे स्पष्ट आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.