Saate Gaon : अभिमानास्पद! साते गावातील सख्या बहीण भावाची महाराष्ट्र पोलीसमध्ये नियुक्ती

एमपीसी न्यूज- (श्याम मालपोटे) मुंबई पोलीस शिपाई पदाचा निकाल दि.17 रोजी लागला अन् साते गावात आनंदाला पारावर राहिला नाही, कारण ही तसेच होते पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील या छोट्याशा साते गावातील (Saate Gaon) सानिका मारुती काजळे आणि अभिषेक मारूती काजळे ह्या सख्ख्या बहीण-भाऊ जोडीने पोलीस भरती मध्ये बाजी मारली. तसेच ओमकार भूंडे या युवकाने देखील पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे.

Manobodh : मनोबोध भाग 100 – येथासांग रे कर्म तेही घडेना

अभिषेक आणि सानिका दोघांच्या यशाने मात्र संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.या यशामुळे आईच्याही डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.मुलांच्या कष्टाचे चीज झाले असे सर्व ग्रामस्थही बोलत होते.अभिषेक आणि सानिका यांच्या घरची परिस्थिती जेमतेम बेताचीच,आई गावातील एका पोल्ट्री कंपनीमध्ये काम करते आणि वडील कै.मारूती काजळे यांचे सानिका लहान असतानाच निधन झाले.

पण पैलवान मारूती काजळे हे नाव मात्र कधीच कोणी विसरू शकत नाही, कारण कुस्ती क्षेत्रात त्यांचे नाव होते तसेच पोहण्यात ते तरबेज होते.अभिषेक चे कुटुंब मुळचे चिखलचे गावचे पण लहानपणापासून साते गावात मामाकडे राहायला आहे. दोघांचेही प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साते (Saate Gaon) येथे पूर्ण झाले.

माध्यमिक शिक्षण जय शिवराय प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल साते येथे आणि त्यानंतर व्ही. पी. एस. कॉलेज लोणावळा येथे पूर्ण केले. अभिषेक ने नवनीत करियर अकादमी कामशेत येथे तर सानिका ने शौर्य अकादमी-वडगाव येथे पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेतले. सातत्य, अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न या पंचसुत्री च्या जोरावर ह्या दोघांनी यश संपादन केले.प्रतिकूल परिस्थितीतही आई श्रीमती वंदना मारूती काजळे तसेच मामा अंनता चंद्रकांत आगळमे (सर) यांनी कशाची कमी पडू नाही दिली.

आईने काबाडकष्ट करत मुलांना घडविले. आईच्या कष्टाची जाण सतत ठेवली त्यामुळे आज दोघांनीही यश संपादन केले आहे.गावातील इतर मुले व मुली पोलीस भरती साठी प्रयत्न करत आहेत. तसेच ह्याच परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र मुंबई पोलीस पदाला गवसणी घातली आहे तो म्हणजे ओमकार भाऊ भुंडे, अतिशय हुशार आणि आदर्श युवक, शिव व्याख्याते या नावाने ओळख असलेला ओमकार गावातील जिल्हा परिषद मध्ये शिकला, उच्य माध्यमिक शिक्षण गोल्डन ग्लेड्स हायस्कूल, कांब्रे मावळ आणि कॉलेज व्ही.पी.एस.लोणावळा येथे तर पोलीस भरती प्रशिक्षण नवनीत अकादमी, कामशेत येथे पुर्ण केले.

ओमकारनेही पहिल्या प्रयत्नात यश प्राप्त केले म्हणून घरच्या सर्वांनी आनंद व्यक्त केला. ब्राम्हणवाडी साते (Saate) Gaonयेथील विशाल पवार यांचीही मुंबई पोलीस पदी निवड झाली आणि गेल्या महिन्यात मोहितेवाडी (साते) येथील नागेश मोहिते यांची पुणे ग्रामीण पोलीस मध्ये निवड झाली या सर्वांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

या सर्व मुलांनी ऐतिहासिक साते गावच्या वैभवात भर केली आहे, पुणे जिल्ह्यात गावाचे नाव रोशन केले त्याबद्दल गावकऱ्यांनी कौतुक केले आणि आणखी गावातील विद्यार्थ्यांनी सरकारी परीक्षा देवून एक कर्तव्य दक्ष अधिकारी तयार झाले पाहिजे ही भावना तुकाराम बाळू आगळमे व ग्रामस्थांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.