Pune ZP Appeal : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी जुने मोबाइल, लॅपटॉप द्या

Provide old mobiles, laptops for online education of students in rural areas; Appeal to the citizens of Pune ZP विद्यार्थ्यांकडे ही मोबाईल, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप किंवा संगणक असणे गरजेचे आहे. परंतु ग्रामीण भागात शिकणाऱ्या 50 टक्के विद्यार्थ्यांजवळ यापैकी कुठलीच वस्तू नाहीये.

एमपीसी न्यूज – Covid-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर राज्यातील शाळा महाविद्यालय नियमित सुरू करणं आत्ताच शक्य नाहीये. परंतु शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असणे गरजेचे आहे. त्यासाठी ऑनलाइन शिक्षण हा एक चांगला पर्याय आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य, व्हिडीओ, ऑनलाइनची प्रक्रिया शाळांकडे उपलब्ध आहे. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांकडे ही मोबाईल, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप किंवा संगणक असणे गरजेचे आहे. परंतु ग्रामीण भागात शिकणाऱ्या 50 टक्के विद्यार्थ्यांजवळ यापैकी कुठलीच वस्तू नाहीये. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आपल्याजवळील सुस्थितीत असणारे जुने मोबाईल, लॅपटॉप, संगणक किंवा स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही शाळेला दान करावे असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

अशा वस्तू जर नागरिकांनी दान केल्या तर ते एखाद्या गरजू मुलाला देण्यात येणार आहे. त्यानंतर हे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील. आणि सध्या सुरू असलेल्या covid-19 च्या काळातही शिक्षणापासून ते वंचित राहणार नाहीत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील शाळांना अशा वस्तू दान स्वरूपात देण्यात याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.