BNR-HDR-TOP-Mobile

Pune : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि रबी हंगामासाठी बी-बियाणे द्या

'महाराष्ट्र जोशी समाज संघटने'ची मागणी

एमपीसी न्यूज – अतिवृष्टी, महापूर आणि परतीच्या पावसाने हानी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि रबी हंगामासाठी बी -बियाणे देण्याची मागणी महाराष्ट्र जोशी समाज संघटनेने आज पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

महाराष्ट्र जोशी समाज संघटना (महाराष्ट्र राज्य) तर्फे आज दिनांक ८ नोव्हेंबर रोजी नवलकिशोर राम यांना मागण्यांचे निवेदन दिले.पुणे जिल्ह्यात व इतर ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी महापूर व परतीच्या पावसामुळे पिकांचे व मालमत्तेचे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना ,जनतेला तातडीने दिलासा मिळण्याबाबत मागण्या करण्यात आल्या आहेत .

त्यावेळी  कैलास हेंद्रे (अध्यक्ष,महाराष्ट्र जोशी समाज संघटना ,महाराष्ट्र राज्य), निलेश प्रकाश निकम(उपाध्यक्ष, ,महाराष्ट्र जोशी समाज संघटना ,महाराष्ट्र राज्य) संदीप निकम (संपर्कप्रमुख, उत्तर महाराष्ट्र ), श्री.संजय गुलाब जोशी (पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख) ,  गणेश जोशी( शहराध्यक्ष, पिंपरी चिंचवड), सौ.शुभांगी (सीमा) महेश हेंद्रे,(महिला आघाडी अध्यक्ष पुणे शहर), सौ.सुरेखा निकम (महिला संघटक प्रमुख), संदेश जोशी,महेश हेंद्रे ,साहिल साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी निलेश निकम यांनी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यांचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे, रब्बीच्या पेरणीसाठी बी-बियाणे देण्यात यावे अशी मागणी केली आहे. तसेच पुढील पंधरा दिवसात जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर  राज्यपालांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे नीलेश निकम यांनी दिला .

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like