Pimpri : …लायन्स क्लबकडून जलदिंडी प्रतिष्ठानला बोट प्रदान 

एमपीसी न्यूज – नदी प्रदूषण आणि नदीचे आरोग्य या विषयावर गावोगावी जलदिंडी काढून जनजागृती करणाऱ्या जलदिंडी प्रतिष्ठानला लायन्स क्लबकडून ८ आसनी बोट भेट म्हणून देण्यात आली आहे. या बोटीचा वापर लोकांना नदीची ओळख करून देण्यासाठी होणार आहे. 
नदीतून प्रवास करत गावोगावी नदी विषयी जनजागृती करणाऱ्या जलदिंडी प्रतिष्ठानचा सन्मान करत लायन्स क्लबकडून त्यांना ८ आसनी बोट भेट म्हणून देण्यात आली आहे. लायन्स क्लबने शनिवारी (दि. ८ ) आयोजित केलेल्या जागर सेवेचा या कार्यक्रमात ही  बोट जलदिंडी प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. विश्वास येवले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

लायन्स क्लबचे फर्स्ट लेडी ऑफ रिजन उज्वला कुलकर्णी यांच्या विशेष प्रयत्नातून व विभागीय अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांच्या पुढाकाराने ही बोट त्यांना देण्यात आली. या प्रसंगी उपस्थित प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी या बोटीसाठी लागणारे इंजिन आमच्यातर्फे पुरविले जाईल असे सांगितले.
जागर सेवेचा कार्यक्रमात यावेळी डॉ. विश्वास येवले यांनी मनोगत व्यक्त केले. नदी आणि नदीचे आरोग्य या विषयावर भाष्य करत त्यांनी ‘जलयोग’ या नवीन संकल्पनेची ओळख लोकांना करून दिली. जलदिंडी इंद्रायणीमधून आळंदी ते पंढरपूर आणि पवना नदीमधून पवना धारणच्या पायथ्यापासून  ते मोरया गोसावी समाधी स्थळ चिंचवडगाव असा प्रवास करते. भेट म्हणून देण्यात आलेल्या बोटचा वापर लोकांना नदी विषयी माहिती आणि प्रबोधन करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती डॉ. येवले यांनी दिली.
प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी यावेळी ‘हवामान बदल’ आणि ‘बायो मोबिलिटी’ या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. विभागीय अध्यक्षला प्रदीप कुलकर्णी यांच्या जागर सेवेचा या कार्यक्रमाचे उद्घाटन लायन्स क्लबचे जिल्हा प्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांनी केले. याप्रसंगी लायन्स क्लबचे फर्स्ट लेडी ऑफ डिस्ट्रिक्ट ला. श्रद्धा पेठे, फर्स्ट लेडी ऑफ रिजन ला. उज्वला कुलकर्णी, ला. अभय शास्त्री, ला. हेमंत नाईक तसेच झोन चेअरपर्सन ला. कोळी, ला. भलगट, ला. धुमाळ, ला. खांबेटे व इतर  लायन मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.