Pimpri :आमदार निधीतून येथील आदिनाथ संघ यांना कबड्डी मॅट प्रदान

एमपीसी न्यूज –  बोपखेल गावातील कबड्डी खेळाडुंसांठी आमदार निधीतून आज येथील आदिनाथ संघ यांना कबड्डी मॅट प्रदान करण्यात आली. याप्रसंगी उद्घाटन करताना आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख शिरूर लोकसभा सुलभा उबाळे, पिंपरी विधानसभा संघटिका प्रतिक्षा घुले, रवि कोवे  आदी उपस्थित होते.

तसेच वर्दहस्त सोसायटी, लिंक रोड, चिंचवड येथे पेव्हिंग ब्लॉक कामाचे भूमिपुजन करताना आमदार गौतम चाबुकस्वार. यावेळी  सुलभा उबाळे,मा.नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, उमेश गोलांडे, नकुल भोईर, सोसायटीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे पिंपरी महापालिकेस रस्त्यासाठी सव्वा एकर जागा देण्यास एमआयडीसीने मान्यता दिल्याच्या पार्श्वभूमीवर या बहुप्रलंबित प्रश्नाची सोडवणूक आमदार गौतम चाबुकस्वार यांनी केली. त्याबद्दल स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटीच्या वतीने आमदारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक प्रमोद कुटे,नगरसेविका शर्मिला बाबर तसेच सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.